नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल, सय्यदपिंप्रीच्या गोदामात यंत्रांचे जतन | पुढारी

नाशिकमध्ये १८ हजार ईव्हीएम दाखल, सय्यदपिंप्रीच्या गोदामात यंत्रांचे जतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले १८,००० ईव्हीएम दाखल मंगळवारी (दि.२५) नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सय्यदपिंप्री येथील निवडणूक गोदामात हे यंत्र ठेवण्यात आले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या यंत्रांचा उपयोग केला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडूनही लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यादृष्टीने आवश्यक साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून गेल्या महिन्यात जिल्ह्यासाठी ७ हजार १०० व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले. या सर्व यंत्रांचे सय्यदप्रिंपी येथील गोदामात स्कॅनिंग व एटीपीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आता नवीन १८ हजार ईव्हीएम्स‌् उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा निवडणूक शाखेचे पथक बंगलोरस्थित भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कंपनीमधून हे यंत्र घेऊन मंगळवारी (दि.२४) रात्री उशिराने नाशिकमध्ये दाखल झाले. या यंत्रांमध्ये ११ हजार ७२० बॅलेट युनिट्स, तर ६ हजार ६०० कंट्रोल युनिट्सचा समावेश आहे. हे सर्व यंत्र सय्यदपिंप्री येथे निवडणूक शाखेच्या गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. पुढील महिन्यात दिल्ली येथून निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ येऊन यंत्रांची तपासणी करतील, अशी माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button