नाशिक : आजपासून इस्कॉन मंदिरात चंदन यात्रेस प्रारंभ

नाशिक : आजपासून सुरु झालेल्या चंदनयात्रेनिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा लेप लावण्यात आला. (छाया : रुद्र फोटो )
नाशिक : आजपासून सुरु झालेल्या चंदनयात्रेनिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा लेप लावण्यात आला. (छाया : रुद्र फोटो )
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
द्वारका येथील श्री श्री राधा मदनगोपाल (इस्कॉन) मंदिरात रविवार (दि. २३) पासून चंदनयात्रेला प्रारंभ झाला आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे, अक्षयतृतीयेपासून पुढील २१ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो.
उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेत वाढ होऊन वातावरणात उन्हाची तीव्रता जाणवायला सुरुवात होते. उन्हाच्या तीव्रतेपासून भगवंतांना शीतलता मिळावी, या भावनेतून भक्त भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहांवर चंदनाचा लेप लावतात. अक्षयतृतीयेपासून पुढे २१ दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज भगवान श्रीकृष्णाचा शृंगार करताना पुजारी विग्रहांवर चंदनाचे लेपन करतात. त्यासाठी सर्व भक्त रोज सकाळी चंदन उगाळून ते भगवंतांच्या सेवेत अर्पण करतील. या सेवेसाठी सर्व वयोगटातील भक्त उत्साहाने सहभागी होतात. हा उत्सव वृंदावन व जगन्नाथपुरी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सोबतच जगभरातील सर्व इस्कॉन मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहाने केला जातो. यानिमित्ताने आज रविवार (दि. २३) मंदिरातील गाभाऱ्यात विविध प्रकारच्या आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.  यामध्ये तब्बल ४०० किलोहून अधिक आंब्यांचा वापर करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसरात विविध प्रकारच्या आंब्याच्या सुगंधाने वातावरण मोहित झाले आहे. नाशिककरांनी या चंदन उत्सवात सहभागी होऊन विशेष दर्शनासाठी मंदिराला भेट द्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले.
चंदन यात्रेचे काही आकर्षक फोटो पहा…
नाशिक : मंदिरातील गाभाऱ्यात विविध प्रकारच्या आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो )
नाशिक : मंदिरातील गाभाऱ्यात विविध प्रकारच्या आंब्याची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे : रुद्र फोटो )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news