नाशिक : अंबड औद्योगिक पोलिस चौकीचे १० एप्रिल'ला उद्घाटन : आ. सीमा हिरे | पुढारी

नाशिक : अंबड औद्योगिक पोलिस चौकीचे १० एप्रिल'ला उद्घाटन : आ. सीमा हिरे

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या परंतु पोलिस ठाण्याप्रमाणे चालणाऱ्या अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे उद्घाटन सोमवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असल्याची माहिती आ. सीमा हिरे यांनी दिली.

अंबड औद्योगिक वसाहतीत वाढत्या गुन्हेगारीमुळे स्वतंत्र पोलिस ठाणे असावे, अशी पंचक्रोशीतील नागरिक उद्योजकांची मागणी होती. अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन अंबड औद्योगिक वसाहत साठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती चा प्रस्ताव पोलिस आयुक्त यांनी गृह विभागाकडे पाठविला आहे. नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे तो पर्यत अंबड औद्योगिक वसाहत येथे पोलिस ठाणे प्रमाणेच काम चालणारे पोलिस चौकी सुरु करणार आहे. या चौकी चे काम सुरु आहे. या चौकीला काल रविवारी सकाळी आ. सीमा हिरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रश्मी हिरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी नवीन पोलिस चौकी येथे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे कक्ष तसेच इतर माहिती दिली. पोलिस चौकीचे काम लवकरच पुर्ण होणार आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिजली यांनी सांगितले.  यावेळी आ. सीमा हिरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव यांनी पोलिस चौकीत सुरू असलेल्या कामाची पहाणी केली. या नंतर आ. सीमा हिरे यांनी सांगितले की,  चुंचाळे अंबड तसेच अंबड औद्योगिक वसाहत या भागात गुन्हेगारी वाढल्याने अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती करावी या साठी सभागृहातही मागणी केली आहे. पाठपुरावा सुरू आहे तसेच नवीन पोलिस ठाणेचा प्रस्ताव गृह विभागाकडे आहे लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असून तो पर्यत अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकी येथे पोलिस ठाणे प्रमाणे कामकाज चालणार असल्याचे सीमा हिरे यांनी सांगितले.

चौकीचे उद्घाटन सोमवार दि.१० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असल्याची माहिती आ. सीमा हिरे यांनी दिली. चौकीच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

नवीन चौकीसाठी एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि ३० अमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले, पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार, पोलिस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश वराडे, रामदास दातीर, संजय गुंजाळ, अनिल माळी उपस्थित होते .

Back to top button