नाशिक : रायुकाँचे केंद्राविरोधात एप्रिल फुल आंदोलन | पुढारी

नाशिक : रायुकाँचे केंद्राविरोधात एप्रिल फुल आंदोलन

नाशिक (पंचवटी) : पुढारीे वृत्तसेवा 

केंद्र सरकारच्यावतीने विकासाच्या आणि रोजगाराच्या केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ एप्रिल फुल आहे अशी घोषणाबाजी करत आज नाशिक शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे व युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी चेतन कासव, बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, अमोल नाईक, विशाल डोके, राहुल कमानकर, निलेश भंदुरे, विशाल मयेकर, जाणु नवले, सोनु वायकर, रोहित पाटील, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, कुलदीप जेजुरकर, सुयश मेने सहभागी होते.

अनोखी घोषणाबाजी

विकासाच काय झालं ? एप्रिल फुल, रोजगाराचं काय झालं? एप्रिल फुल, दोन कोटी नोकऱ्यांच काय झालं ? एप्रिल फुलच्या घोषणा बाजी करत आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केवळ आश्वासन देण्यात आले असून प्रत्यक्षात तरुणांना रोजगार मिळाला नाही. महागाईने जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. शासनाची धोरणे देखील अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे आम्ही शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी एप्रिल फुल आंदोलन छेडले.

– अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

हेही वाचा : 

Back to top button