Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जण जखमी | पुढारी

Nashik Lasalgaon : सायकलस्वाराला वाचविण्याच्या नादात अपघात; 10 जण जखमी

लासलगाव (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा

शेतमजूर असलेल्या क्रुझरचा लासलगाव जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

पुणे  जिल्ह्यातील चाकण, नारायणगाव परिसरामध्ये सध्या उन्हाळ कांदा काढण्याचे काम सुरु झाले आहे. कांदा काढणीच्या कामासाठी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथून चार क्रुझर गाड्यांमध्ये शेत मजूर हे लासलगाव मार्गे नारायणगाव येथे जात असताना लासलगाव-चांदवड रोडवर लासलगाव जवळ एका क्रूजर गाडी समोर अचानक सायकलस्वार आला. सायकलस्वाराला वाचवायच्या नादामध्ये क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये पलटी झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात 10 जण जखमी झाले आहे. त्यात पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. पाच जणांवर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button