प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या गाभाऱ्यात द्राक्षांची सुंदर सजावट करण्यात आल्याने सर्वांचेच लक्ष वेधले. स्वामींच्या प्रकटदिनानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महायज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाशिक येथील स्वामी भक्त मंगेश जठार व वैजयंती जठार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रकट दिनाच्या औचित्याने मठाचे अध्यक्ष तथा माऊली नितीन महाले यांनी स्वखर्चातून मानवसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून लहान मुलांना नवीन कपडे वाटप केले. याप्रसंगी मठाचे कार्यवाहक तथा नगरसेवक सचिन महाले, कार्यवाहक उत्तमशेठ पगारिया, कार्यवाहक प्रशांत मोरे, कार्यवाहक अजय सोनवणे, सेवेकरी प्रसाद पवार, प्रतिकराज अहिरे, गोकुळ पाटोळे, स्वामी जाधव, ओम जंगम, आदींनी मेहनत घेतली. यावेळी मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गर्दीमुळे मठात बसायला जागा नसल्याने मठाबाहेरील प्रांगणात बसून भाविकांनी माऊली नितिन महाले यांनी केलेल्या स्वामींच्या प्रवचनाचा आनंद घेतला.