नाशिक : ‘मालेगाव मध्य’ येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक  | पुढारी

नाशिक : 'मालेगाव मध्य' येथे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झळकले उर्दू फलक 

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेल्यानंतर राज्यात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी निघालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा रविवारी (दि.26) मालेगाव येथे होत आहे. त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. यामध्ये मालेगावात विविध ठिकठिकाणी झळकलेले उर्दू भाषेतील फलक हा चर्चेचा विषय ठरत आहे. मराठी मुस्लिम संघ तसेच महाविकास आघाडी समर्थक ठाकरे गटाची पाठराखण करताना दिसत आहेत. त्यातूनच मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल मतदार संघात ठाकरे यांच्या स्वागतासाठी उर्दू भाषेतून झळकलेले फलक सोशल मीडियावरही वायरल होत आहेत.
याठिकाणी लागले फलक: 
किदवाई रोड, बसस्थानक, कुसुंबा रोड, धुळे रस्ता या मुख्य मार्ग अन् भागात हे फलक आहेत.

हेही वाचा:

Back to top button