जळगाव: शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याचा सुनेने काढला काटा | पुढारी

जळगाव: शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याचा सुनेने काढला काटा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील किनगाव येथील वृद्धाचा खून करुन पुलाखाली मृतदेह फेकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी मृत वृद्धाच्या सुनेसह एका तरूणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील भीमराव शंकर सोनवणे (वय ६०) या वृद्धाचा मृतदेह किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्यावरील पुलाखाली शुक्रवारी (दि.२४) आढळून आला होता. याबाबत खून झालेल्या वृद्धाचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सासऱ्याने सुनेकडे केली शरीरसुखाची मागणी

याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांना सुनेवर संशय आला. यातून सूनेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यात भीमराव सोनवणे यांनी आपल्या सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली असता सुनेने त्यास नकार दिला. या वादातून सुनेने संशयित आरोपी जावेद शाह अली शाह (वय २८, रा. वरणगाव ह.मु. उदळी, ता. रावेर) याच्या मदतीने सासरे भिमराव सोनवणे यांचा धारदार हत्याराने खून केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा 

Back to top button