जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात | पुढारी

जळगाव : अवैध धंद्यांसाठी घेतली लाच; पोलिस अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षकासह अन्य दोघा पोलिसांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

फैजपूर भागातील अवैध धंदे चालकाकडे सट्टा-पत्त्याचा धंदा नियमित सुरू ठेवण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी संशयीतांनी पाच हजारांची लाच शुक्रवारी मागून त्यावर चार हजारात तडजोड केली मात्र याबाबत धंदे चालकाने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. फैजपूर पोलिस ठाण्याच्या आवारात चार हजार घेताना एएसआय सांगळे यांना अटक करण्यात आल्यानंतर अन्य दोघांचाही सहभाग आढळल्याने त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील व सहकार्‍यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

हेही वाचा:

Back to top button