नाशिक : अखेर जवान गीते यांचा सापडला मृतदेह

नाशिक : सिन्नर तालुक्यातील चौंढी गावचे जवान गणेश गीते दुचाकीवरून तोल जाऊन मोटार सायकलसह गोदावरी उजवा कालव्यात पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सुमारे 18 ते 20 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नव्हता. रात्री उशिरा पर्यंत जवान सापडत नसल्याने ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश केला. पालकमंत्री दादा भुसे यांना घेराव देखील घातला.
त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून चौंढी गाठले व जोपर्यंत जवान सापडत नाही तोपर्यंत स्वतः ठान मांडून बसले होते. सर्व यंत्रणा कामाला लागल्याने अखेर जवानाचा शोध लागला, जवानाचा मृतदेह सापडला आहे. मात्र दुर्दैवाने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने गीते यांच्या यांच्या पत्नी, मुलगा व मुलीला वाचविण्यात यश आले आहे.