नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे | पुढारी

नाशिक : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यात तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी. तसेच कांदा पिकास हमीभाव देण्यात यावा. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा अशायचे निवेदन प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना देण्यात आले.

गेल्या दीड ते दोन महिन्यापासून कांदा पिकांचे भाव घसरले आहे. पर्यायाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात फुटी कवडी देखील मिळत नाही आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कांद्यास हमीभाव देण्यात यावा, कांदयास १ हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्यात यावे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, घरगुती गस, पेट्रोल डीझेल यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा आदीसह इतर मागण्या निवदेनात नमूद करण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितिन आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, शहरप्रमुख सदीप उगले, तालुका संघटक केशव ठाकरे, महिला आघाडी संघटक रौशनी कुंभार्डे, गुड्डू खैरणार, सागर बर्वे, संजय गांगुर्डे, गटप्रमूख कैलास देवरे, उपतालुका प्रमुख रवि काळे, अशोक शिंदे, दत्तु शेळके, संतोष मोहन, युवासेना तालुकाअधिकारी रोहित ठाकरे, राजू ठाकरे, वसंत सानप, संजय गांगुर्डे, वसंत सानप, निवृत्ती कुंभार्डे, माजी सरपंच रवींद्र पुरकर, शंकर पूरकर, सौरभ देशमाने, सुनील बागुल, शभूराजे खैरे, निलेश ठाकरे, सागर जगताप, राजेंद्र ठाकरे, संदिप साठे, परशराम शिंदे, माजी जिल्हापरीषद सदस्य दादाभाऊ अहिरे, नाना धनाईत आदीसह गटप्रमुख, गणप्रमुख, बूथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button