Latest
नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका
नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सुरुवातीला पाच मिनिटे टपोर्या गारानंतर पाच ते दहा मिनिटे लहान गारांचा मारा झाल्याने परिसरातील गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणाने पिकांवर बुरशीचा धोका निर्माण झाला आहे. उभ्या कांद्यांना औषधफवारणी करण्यासाठी शेतकरी खर्च करावा का नाही, अशा दुहेरी मनस्थितीत आहे.

