

वणी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
वणी बसस्थानकाच्या चौकशी कक्षा समोर अज्ञात व्यक्तीची दगडाने हत्या करण्यात आली आहे. कक्षा समोर हत्या करून मृतदेह बसस्थानकाच्या बाजुला झाडात नेऊन टाकण्यात आला आहे. चौकशी कक्षाच्या खिडकीच्या समोर मोठा दगड व रक्त सांडलेले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपुत घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करत आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असावा अशी माहिती मिळत आहे. परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. बसस्थानकात (दि. ३) मध्यरात्री एक ते चार वाजेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाची दगडाने हत्या करुन मृतदेह बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत काटेरी झाडांच्या बाजूला टाकून देण्यात आला.
घटनेनंतर बसस्थानाकातील वाहतूक नियंत्रक कार्यालयाचा दरवाजा व खिडकीचे गज वाकवून आतमध्ये प्रवेश करीत आपण केलेले कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले असावे म्हणून संशयिताने पुरावा नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेस लावलेले इन्वर्टर काढून नेले. मात्र डीव्हीआर तसाच राहिल्याने त्यातून घटनेचे रेकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत करुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान पोलिसांनी श्वान व ठसे तज्ञ पथकास पाचारण करुन आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला असून घटनास्थळावर दगड व अन्य वस्तूंवरील ठसे पथकाने घेतली आहे. यावेळी श्वानाने वाहतूक नियंत्रक कार्यालय ते मृतदेह पडलेले ठिकाण व व नदी बाजूकडे जावून परत वाहतूक नियंत्रक कार्यालय असा माघ काढला. घटनास्थळी पेठचे उपविभागीय पोलिस अधिकारी फडताळे यांनी भेट देवून पाहाणी केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे आदीसंह पोलिस करीत आहे.
हेही वाचा :