

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तळवाडे रोडलगतच्या सी आनंद रो हाउस नंबर 6 मध्ये सोमवारी (दि. २०) दुपारच्या सुमारास एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. याबाबत चांदवड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत वसंतराव सोनवणे (रा. रावळगाव, ता. मालेगाव) हे हल्ली तळवाडे रोड येथील साई आनंद रो हाउसमध्ये राहात होते. त्यांच्या घराचा दरवाजा आतून बरेच दिवस बंद होता. त्यामुळे किरण क्षीरसागर यांनी दरवाजा उघडून घरात बघितले असता, बेडरूममधील लोखंडी खाटेवर शशिकांत सोनवणे यांचा मृतदेह आढळला. त्यांनी लगेच चांदवड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
सोनवणे यांचा मृत्यू ७ ते ८ दिवसांपूर्वी झालेला असल्याने त्यांचे शरीर पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होते. त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. पोलिस हवालदार बापूसाहेब चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा :