नाशिक : कंत्राटी सफाई कामगारांचे मनसे पदाधिकाऱ्यांसह उपोषण | पुढारी

नाशिक : कंत्राटी सफाई कामगारांचे मनसे पदाधिकाऱ्यांसह उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक महापालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कंपनीने बेकायदेशीररीत्या काढल्याने सफाई कामगारांसह त्यांच्यासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर सोमवार (दि.२०)पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार विविध मार्गांनी गोरगरीब कामगारांच्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे आदींसह मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना सादर केले आहे. मात्र, अद्यापही संबंधित कामगारांना न्याय मिळाला नसून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषणाचे हत्यार हाती घेतले आहे. उपोषणाला बसण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित सर्व यंत्रणेला माहिती देऊनही याबाबत प्रशासनाला जाग आलेली नसल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला आहे. आंदोलनाची दखल घेऊन तत्काळ संबंधित कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन हाती घेण्याचा इशारा देत कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, विभाग अध्यक्ष योगेश लभडे, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, अमित गांगुर्डे, नितीन माळी व धीरज भोसले, मिलिंद कांबळे यांच्यासह अक्षरा घोडके, ॲड. महेंद्र डहाळे, विशाल भावले, पंकज दातीर तसेच समाधान चव्हाण, गणेश दातीर, किशोर जाधव आमरण उपोषणास बसले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button