धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ | पुढारी

धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गंगाधरी ग्रामपंचायतचे राष्ट्रवादीचे सरपंच सुनील खैरनार, उपसरपंच वर्षा ईघे, गणेश ईघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत रविवारी (दि. 19) आमदार निवासस्थानी आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी शिवसेना पक्षात आपल्याला योग्य तो मानसन्मान मिळेल. आपल्या सूचना ऐकून घेतल्या जातील. विकासाकरिता सदैव आपल्या सोबत राहू अशी ग्वाही कांदे यांनी दिली.

गंगाधरी गावात राष्ट्रवादीचे चांगले वर्चस्व आहे. मात्र सुहास कांदे यांनी या प्रवेशाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला जोरदार झटका दिला आहे. आमदार कांदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या प्रवेशानंतर नांदगाव तालुक्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवनेच्या ठाकरे गटापाठोपाठ राष्ट्रवादीलाही तशीच गळती लागते की, काय अशी भीती व्यक्त होते आहे. कारण आमदार कांदे यांनी याआधीही मतदारसंघात राष्ट्रवादीला असे धक्के दिले आहेत.

रविवारी झालेल्या या प्रवेश सोहळ्या प्रसंगी जिल्हा प्रमुख किरण देवरे, गंगाधरी चे शिवसेना शाखा प्रमुख दिगंबर भागवत, रमेश गांगुर्डे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर, रामहरी ईघे, भगीरथ जेजुरकर, सोपान जाधव, नाना ईघें, साहेबराव मोकळं, संदीप खैरनार, अनिल बागुल, भरत ईघें उपस्थित होते.

Back to top button