नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा | पुढारी

नाशिक : अत्याचार करत पीडितेला साडेचार लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लग्न करत असल्याचे भासवत एकाने पीडितेवर वारंवार अत्याचार करत तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी चार लाख ६० हजार रुपये घेत गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित शोएब निसार शेख (रा. मदिना चौक) याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयिताने २०११ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नाशिक, सापुतारा, मुंबई, त्र्यंबकेश्वर येथे नेऊन अत्याचार केला. आपण लग्न करणार असल्याचे भासवून संशयिताने पीडितेकडून घरासाठी डिपॉझिट म्हणून तीन लाख रुपये व दोन वाहने घेण्यासाठी एक लाख ६० हजार रुपये घेतले. तसेच पीडितेस मारहाणही केली. आपले शोषण व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने मुंबई नाका पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

हेही वाचा :

Back to top button