नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस | पुढारी

नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही महाशिवरात्रीला (दि. १८) भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सिटीलिंकतर्फे विशेष जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत सिटीलिंकतर्फे तपोवन आगारातून त्र्यंबकेश्वरसाठी १५ बसेसच्या माध्यमातून १०६ बसफेर्‍या सुरू आहेत, तर नाशिकरोड आगारातून १० बसेसच्या माध्यमातून ६० बसफेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी होत असतात. परंतु, महाशिवरात्रीनिमित्त नियमित बसफेर्‍यांव्यतिरिक्त तपोवन आगारातून आणखी ६ बसेसच्या माध्यमातून ४८, तर नाशिकरोड आगारातून ४ बसेसच्या माध्यमातून ३२ अशा एकूण १० जादा बसेसच्या माध्यमातून ८० जादा बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा ८० बसफेर्‍या व नियमित १६६ बसफेर्‍या अशा २४६ बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा बसेसचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

Back to top button