नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण | पुढारी

नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, कोरोना काळात सुमारे २२० कोटी लसीकरण करून सरकारने जनतेचे रक्षण केले. भारतही लस बनवण्यास सक्षम झाला. सर्व जगात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धडाडीमुळे हे शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला.

कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी सुरगाणा परिसरातील समस्या मांडल्या. कार्यक्रमास तहसीलदार पंकज पवार, भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, जिल्हा सरचिटणीस मंगला शिंदे, नगराध्यक्ष मेघा धिंधळे, उपनगराध्यक्ष लता बोरस्ते, शहर अध्यक्ष नितीन गांगुर्डे, योगेश तिडके तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button