नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे शुक्रवार (दि. १०) पासून भाजपची दोनदिवसीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह केंद्र व राज्यातील पक्षाचे मंत्री व वरिष्ठ पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे शुक्रवारी (दि. १०) पक्षाच्या निमंत्रितांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, सहकारमंत्री अतुल सावे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच शनिवारी (दि. ११) भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, ना. गोयल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री सुरेश खाडे, केंद्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील व भागवत कराड, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह पक्षाचे अन्य मंत्री व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शहरात दोन दिवस व्हीव्हीआयपींची मांदियाळी असल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पोलिस विभागाकडून बंदोबस्तासाठीचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.
हेही वाचा :