नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा

नाशिक : बेकायदेशीररित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या संशयिताविरोधात उपनिबंधक विभागाने कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात राजू शंकर पवार (रा. अभियंता नगर, कामटवाडे, सिडको) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी इतर संशयितावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात तक्रारदाराने उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीनुसार विभागाने शहरातील काही सावकारांच्या घरझडती घेतल्या होत्या. तेथून महत्वाचे कागदपत्र जप्त करून विभागाणे तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी केली. त्यात शहानिशा केल्यानंतर संशयित राजू पवार हा बेकायदेशीर रित्या सावकारी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागाने अंबड पोलीस ठाण्यात राजू पवार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी दोन प्रकरणांमध्ये तथ्य आढळल्याने मंगळवारी (दि. ७) सहकार अधिकारी श्रेणी-एक प्रदीप महाजन यांनी अंबड पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतल्याचे समजते. सहकार खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार धाड टाकलेल्यांपैकी आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे खाजगी सावकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असले तरी इतर सावकारांवरील कारवाई तक्रारीअभावी केली जात नव्हती. अखेर काही तक्रारदारांनी मागील महिन्यात शहरातील खाजगी सावकारांविरोधात उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांची शहानिशा करण्यासाठी मागील आठवड्यात पथकाने शहरातील काही सावकारांच्या घरी छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती.

त्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर काही प्रकरणांमध्ये तथ्य आढळून येत असल्याचे समोर आले.
त्यानुसार पथकाने अंबड पोलीस ठाण्यात राजू पवार यास खाजगी सावकाराला विरोधात गुन्हा दाखल केला आहे

हेही वाचा :

Back to top button