नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल | पुढारी

नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल

नाशिक (लासलागाव) : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी जबरदस्त अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला ६०० ते १५५२ रुपये दर असून, सरासरी अवघा ११५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

यंदाचा कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अनेक भागांत कांदा लागवडी अडचणीत आल्या. वाढलेला उत्पादन खर्च, मजूरटंचाई व कांदा काढणीपश्चात दरात झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे यंदा उत्पन्नाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.

येथील मुख्य बाजार समितीमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक होत आहे. मात्र, तुलनेत मागणी घटल्याने कांदा कमी भावात विकावा लागत आहे. देशातून लाल कांद्याची निर्यात सध्या अफगाणिस्तान, आखाती देश व दुबईमार्गे पाकिस्तान येथे होत आहे. मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम या देशांत मागणी तुलनेने कमी झाली आहे. देशांतर्गत गुजरातमधील महूवा, भावनगर, गोंडल भागात आवक अधिक आहे. त्यामुळे दर अपेक्षित नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

Back to top button