नाशिक : बछड्यांच्या शोधात आली मादी बिबट्या; सीसीटिव्हीमध्ये कैद क्षण

नाशिक : बछड्यांच्या शोधात आली मादी बिबट्या; सीसीटिव्हीमध्ये कैद क्षण
Published on
Updated on

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चिंचखेड येथील बहादूर शिवारात माजी सरपंच निवृत्ती मातेरे यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याचे तीन बछडे आढळून आली. ऊसतोड सुरु असलेल्या क्षेत्रामध्ये साधारणपणे २५ ते ३० दिवसांचे बिबट्याचे तीन बछडे ग्रामस्थांना आढळून आली. चिंचखेड येथील वन्यजीव व सर्परक्षक किरण कांबळे, जीवन सतळे हे या ऊस क्षेत्राच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना बिबट्याच्या बछड्यांपासून दूर केले व त्या बछड्यांचे संरक्षण करून वनविभागाला पाचारण केले.

नाशिक वनविभागाचे उपवन संरक्षक उमेश वावरे व सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे तसेच दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी हे सर्व घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व परिसराची व बिबट्याच्या बछड्याची पाहणी केली. दरम्यान साधारणपणे एक महिन्याचे बछडे असतील अशी माहिती यावेळी उमेश वावरे यांनी दिली. तसेच ग्रामस्थांना या परिसरापासून दूर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर या तीन बिबट्यांच्या पिल्लांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. रात्री साडेदहाच्या सुमारास मादी बिबट्या कॅमेरात कैद झाली.

सीसीटीव्हीत कैद झालेली मादी बिबट्या पिल्लांना तिने दूध पाजत असल्याचे आढळून आले. तसेच आपल्या तोंडात एका पिल्लाला घेऊन ती घटनास्थळावरून आपल्या बछड्यांना घेऊन पसार झाल्याचे व्हिडिओमध्ये आढळून आले. बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा वावर या परिसरामध्ये आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये पाणी द्यावयाचे असते. मात्र रात्रीच्या वेळेस गहू, हरभरा पिकांना या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीकामामध्ये अडथळा निर्माण होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याच्या दहशतीने शेतकरी हैराण

चिंचखेडचे पोलीस पाटील सोनवणे यांच्या मेंढ्यांच्या कळपातील भर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान एक मेंढरू ओढून नेऊन फडशा पाडल्याची घटना घडली होती. शेत शिवारात तर बिबट्या पाळीव कुत्र्यांना उचलून नेऊन शिकार करतो. विजेच्या लपंडावामुळे वेळापत्रकानुसार रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्याची कामे करावी लागतात. त्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हैराण झाले आहे. शेतमजूर दिवसासुद्धा काम करताना घाबरत असल्याने वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी कादवा कारखान्याचे संचालक रावसाहेब पाटील, त्र्यंबकराव पाटील, सुभाष मातेरे यांनी केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news