पदवीधर निवडणूक नाशिक,www.pudhari.news
Latest
Nashik Graduate Constituency : पदवीधर मतदार आहात? मग तुमचं नाव शोधा एका क्लीकवर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीतील पदवीधर मतदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रात आहे, याची माहिती शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही ऑनलाइन लिंक तयार केली आहे.
या लिंकमुळे पदवीधर मतदारांना नाव शोधणे सोपे होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया ३० जानेवारी रोजी होणार आहे. संबंधित लिंक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपआयुक्त रमेश काळे यांनी सांगितले आहे.

