Nashik weather : थंडगार वाऱ्यांनी नाशिककर गारठले | पुढारी

Nashik weather : थंडगार वाऱ्यांनी नाशिककर गारठले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर व जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागला. नाशिकचे किमान तापमान 13.2 तर निफाडचे 10.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

मंगळवारच्या तुलनेत तापमानात कमालीची घट दिसून आली. शहरात दिवसभर उन्हाची तिव्रता कमी असल्याने हवेत गारवा होता. आजही नाशिकमध्ये प्रचंड गारवा आहे.  या थंडीमुळे मानवी आरोग्यावर कमालीचा परिणाम झालेला दिसून येत आहे.

जिल्ह्यात वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार असून गहू, हरभरा, कांद्याबरोबरच रब्बीच्या पिकांना हे वातावरण पोषक ठरणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान १४-१५ डिग्री तर कमाल तापमान २६-२९ डिग्री दरम्यान जाणवत असुन ही दोन्ही तापमाने सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने खालावलेली आहेत. त्यामुळे नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतांनाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. हा प्रभाव उत्तर भारतातील थंडी राजस्थान गुजराथ मार्गे कोकणात उतरत आहे.

हेही वाचा :

Back to top button