Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा | पुढारी

Nashik : दबा धरून बसलेल्या बिबट्याने पाडला वासराचा फडशा

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील म्हेळुस्के येथे मंगळवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हेळुस्के येथील शिंदे वस्तीवर शेतकरी बाळासाहेब वामन शिंदे हे आपल्या शेतात (गट नं. ५) कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन सांभाळतात. परंतु, मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याने वासरू ठार झाले. या हल्ल्यात बिबट्याने वासराचा पूर्णतः फडशा पाडल्याने फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक राहिला होता. भरवस्तीवर येऊन बिबट्या वारंवार शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पिंजरा उपलब्ध करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पशुशल्यचिकित्सक डॉ. भोये, वनविभाग कर्मचारी गोरख गांगोडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, सदर घटनेचा पंचनामा वनविभागाकडे पाठवून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तत्काळ उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button