धुळे : शिंदखेडा तालुक्यात जयकुमार रावलांचा बोलबाला; १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व | पुढारी

धुळे : शिंदखेडा तालुक्यात जयकुमार रावलांचा बोलबाला; १३ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिंदखेडा तालुक्यात २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. त्यातील २ सरपंच बिनविरोध झाले होते. तर उर्वरित २१ ग्रामपंचायतीच्या निकाल काल घोषित झाला. त्यात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचाच बोलबाला दिसून आला. शिंदखेडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निकालाला सकाळी १० वाजेपासुन तहसील कार्यालयात सुरुवात झाली.

यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. निकाल जाहीर झालेल्या २३ ग्रामपंचायतींपैकी आ. रावल यांच्या भाजपाचे १३ सरपंच निवडून आले तर शिवसेनचे (ठाकरे गट) २, काँग्रेस १, राष्ट्रवादी १ तर गावागावातील स्थानिक आघाडीचे ७ सरपंच निवडून आले आहेत. निकालानंतर निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांच्या घोषणाबाजी व जल्लोषाने परिसर दणाणून गेला होता. सर्वत्र गुलालाची उधळण करण्यात येत होती. तर पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शांततेचे वातावरण होते.

कोणत्या गावात कुणाची सत्ता

भाजप : – अमळथे, वरसुस, कळगाव, निमगुळ, पाष्टे, रामी, कुरकवाडे, सतारे, आरावे, दराणे, रोहाणे तर बिनविरोध झालेले वणी व गोराणे या गावात भाजपाची सत्ता आली.

शिवसेना (ठाकरे गट ) – नेवाडे व साहुर

स्थानिक आघाडी –  (७) चिमठाणे, जोगशेलु, माळीच, नरडाणा, पिंप्राड, वारुड, विटाई

स्थानिक आघाडीत गावातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मिळून पॅनल तयार करण्यात आले होते. त्यांनाही चांगला कौल जनतेने दिला असून यातील बहुतांश सरपंच हे सत्ताधारी भाजपाकडे जावू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बहुतांश गावात भाजप विरूध्द भाजप अश्याच लढती

निकाल जाहीर झालेल्या शिंदखेडा तालुक्यातील या ग्रामपंचायतीमध्ये बहुतांश गावात दोन्हीही भाजपाचे पॅनल समोरासमोर ठाकले होते. त्यात नरडाणा, कुरकवाडे, आरावे, सतारे आदी गावांचा समावेश होता.

हेही वाचंलत का?

Back to top button