धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई | पुढारी

धुळे : निजामपूर, जैताणेत ५१ वीजचोरांवर कारवाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा

निजामपूर आणि जैताणे गावात वीजचोरी आणि आकडे पकडण्याची धडक मोहीम महावितरणच्या धुळे ग्रामीण विभागीय कार्यालय व साक्री उपविभाग यांच्यामार्फत राबवण्यात आली.

या मोहिमेत अधीक्षक अभियंता, धुळे मंडळ कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चार उपकार्यकारी अभियंता, २२ अधिकारी आणि ११८ जनमित्र यांनी पोलिस बंदोबस्तात सहभाग घेतला. वीजचोरी पकडताना स्थानिक नागरिकांच्या विरोधाचा सामना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावा लागला. तथापि, पोलिस बंदोबस्तात मोहीम राबवून ५१ वीजचोरी प्रकरणे उघडकीस आणली आहेत.  वीजचोरीच्या प्रकरणात दंडाची बिले देण्याचे काम प्रगतिपथावर असून दंडाची वीजबिले न भरणाऱ्या ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी कळवले आहे.

हेही वाचा:

Back to top button