नाशिक : 26 डिसेंबरपासून प्राध्यापक करणार काम बंद

देवळा : प्राचार्य हितेंद्र आहेर यांना निवेदन देताना प्रा. यशवंत खैरनार, 
प्रा. स्वप्नील गरुड, प्रा. महेश वळवी, प्रा. हेमलता निकम, प्रा. सविता पवार, प्रा. विजय अगहिरे, प्रा. संदीप वळवी आदी. (छाया : सोमनाथ जगताप )
देवळा : प्राचार्य हितेंद्र आहेर यांना निवेदन देताना प्रा. यशवंत खैरनार, प्रा. स्वप्नील गरुड, प्रा. महेश वळवी, प्रा. हेमलता निकम, प्रा. सविता पवार, प्रा. विजय अगहिरे, प्रा. संदीप वळवी आदी. (छाया : सोमनाथ जगताप )
Published on
Updated on

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
वरिष्ठ महाविद्यालयात रिक्त असलेल्या तब्बल 16 हजार जागा, 100 % प्राध्यापक भरती न झाल्याने 20 ते 25 हजार सहायक प्राध्यापकांवर तासिका तत्त्वावर अध्यापनाची वेळ आली आहे. समान काम समान वेतनाचा अभाव, विनाअनुदानित महाविद्यालयात कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची रखडलेली नियुक्ती, अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सेट नेट पीएचडीधारक संघर्ष समितीच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सोमवार, दि 26 डिसेंबरपासून परीक्षा काळात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

नाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यातील 15 ते 16 हजार प्राध्यापक बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याने अगोदरच विद्यापीठाच्या लांबलेल्या परीक्षा पुन्हा लांबण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांची 100% भरती करणे आवश्यक आहे या उद्देशानेच अनेक वर्षांपासून नेट सेट पीएचडीधारक संघर्ष समितीकडून वारंवार शासन दरबारी प्रश्न मांडले आहेत, परंतु शासनाने त्याचे गांभीर्य लक्षात न घेता अद्याप कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही याउलट दिरंगाईबरोबरच चुकीचे शासन निर्णय तासिकाधारकांवर लादल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परिणामी 100 टक्के प्राध्यापक भरतीकरिता 27 ऑक्टोबरला पुणे येथील बैठकीत राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र शासन 2088 पदांची भरती करीत आहोत, असे आश्वासन वारंवार देत आहे परंतु भरती प्रस्तावांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही तसेच पुढील भरतीस शासन परवानगी देत नाही या कारणामुळे पात्रताधारकांनी विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. आंदोलनाचे निवेदन देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व प्राचार्य हितेंद्र आहेर, प्रशासकीय अधिकारी डॉ. मालती आहेर यांना देण्यात आले. यावेळी प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी पात्रता धारकांच्या मागणीला पाठिंबा दिला. देवळा महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्रा. यशवंत खैरनार, प्रा. स्वप्नील गरुड, प्रा. महेश वळवी, प्रा.हेमलता निकम, प्रा. सविता पवार, प्रा.विजय अहिरे, प्रा. संदीप वळवी, प्रा. पद्मपाणी जगताप, प्रा. मोसिन मन्सुरी उपस्थित होते.

संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या अशा…
1) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करावी.
2) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार तासिका तत्त्व धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करावे.
3) प्राध्यापक भरती वेळेत पूर्ण करण्याकरिता तत्काळ एनओसी दिल्या जाव्यात.
4) विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकाची नियुक्ती करावी.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news