नाशिक : तळेगावरोहीला आज बारागाड्या ओढणार | पुढारी

नाशिक : तळेगावरोहीला आज बारागाड्या ओढणार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील तळेगावरोही गावचे ग्रामदैवत खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (दि.29) चंपाषष्ठीनिमित्त सायं. 4 वाजता खंडोबाच्या मळ्यात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भगत नामदेव वाकचौरे यांनी दिली. तालुक्यातील तळेगावरोही येथील श्री खंडोबा महाराजांचे देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी चंपाषष्ठीला यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या यात्रोत्सवानिमित्त दररोज सायंकाळी विविध वाघेमंडळीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी गावातून काठी मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायं. 4 ला दिगंबर कदम हे बारागाड्या ओढणार आहेत. त्यानंतर कुस्त्यांची दंगल व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button