Khadse Vs Mahajan : शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका | पुढारी

Khadse Vs Mahajan : शिक्षकांच्या मुलाने कोट्यवधींची मालमत्ता कुठून आणली; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. नोट बंदीच्या काळात तुम्ही काय केलं? हे सर्वांना माहिती आहे. मला जास्त बोलायला लावू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला. मात्र त्यानंतर एकनाथ खडसे यांचा देखील पारा चांगलाच चढला. त्यांनी देखील गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Khadse Vs Mahajan)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. खडसे म्हणाले, मला गिरीश महाजनांची कीव येते, त्यांचं सरकार आहे. त्यांनी मी जे काही केलं आहे त्याची चौकशी करावी. माझं त्यांना आव्हान आहे. एका शिक्षकाच्या मुलाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी आली. माझं 40 वर्षांचं राजकीय जीवन जनतेसमोर आहे. सूडबुद्धीने माझा छळ केला. खोटे गुन्हे दाखल केले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. मला विश्वास आहे, यांना दूध उत्पादक धडा शिकवतील. (Khadse Vs Mahajan)

तुझी जबान चूप का राहिली… (Khadse Vs Mahajan)

नोटबंदीच्या वक्तव्यावर आमदार खडसे चांगलेच भडकले. त्यांनी महाजन यांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आतापर्यंत तुझी जबान चूप का राहिली, कोणाचा दबाव होता? काय शोधायचं ते शोधून काढा, असा जोरदार पलटवार एकनाथ खडसे यांनी केला आहे. पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा यांचा डाव आहे. पण जनता हा डाव हाणून पाडेल.

मराठा समाजाच्या जागेवर अतिक्रमण…

जामनेरमधल्या नगरपालिकेतील गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या. पण त्यांची चौकशी का होत नाही. पेन ड्राईव्ह दिला आहे, तर चौकशी होऊ द्या. चौकशीत सत्य समोर येईल. माझा काय संबंध आहे ते पण समोर येईल. मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्थेच्या जागेवर गिरीश महाजन यांनी अतिक्रमण केलं. जामनेर ते चाळीसगावपर्यंतच्या शैक्षणिक संस्था कशा हडप केल्या हे सर्वांना माहिती आहे, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितले. बाळू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला. दूध उत्पादक संघ आणि त्यात केलेलं काम यावर अधिक बोलणार आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

अधिक वाचा :

Back to top button