उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे उद्घाटन | पुढारी

उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे उद‌्घाटन खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यासाठी ही एक गौरवाची बाब तर आहेच परंतु संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ही अत्याधुनिक सुविधा आरोग्यदायी ठरेल, असे प्रतिपादन खा. गोडसे यांनी केले.

रोबोटिक गुडघा बदलण्याचे चांगले इम्प्लांट पोझिशनिंग, अचूक शस्त्रक्रिया हाड कापणे, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, जलद पुनर्प्राप्ती आणि कमीत कमी हॉस्पिटलमध्ये राहणे असे बरेच फायदे असल्याचे आणि अत्याधुनिक रोबोटच्या साह्याने शस्त्रक्रियाविषयी सविस्तर माहिती सांधेविकार व सांधेबदल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर यांनी दिली. मेडिकल डायरेक्टर डॉ. सुशील पारख यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी अशोका समूहाचे चेअरमन अशोक कटारिया, मेंदू व मणकेविकार शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. शेखर चिरमाडे, सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर, डॉ. प्रणीत सोनावणे, मार्केटिंग हेड पीयूष नांदेडकर हे मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. केंद्रप्रमुख समीर तुळजापूरकर यांनी आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी, नाशिक शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक हे रुग्णांसाठी सर्वोत्तम शस्त्रक्रिया परिणाम देण्यासाठी या रूपाने सज्ज झाले आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नावीन्यपूर्ण आणि कार्यक्षम सेवांद्वारे प्रगत वैद्यकीय सेवेसाठी वचनबद्ध आहेच. परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानच्या साह्याने परिणामकारक उपचार आता रुग्णांवर होणार आहे.

– महेश देगलूरकर, चीफ ऑफ बिझनेस ऑपरेशन्स हेड, मेडिकव्हर हॉस्पिटल समूह

हेही वाचा :

Back to top button