जळगाव : तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या... नाहीतर आत्महत्या करेन; युवतीची धमकी | पुढारी

जळगाव : तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या... नाहीतर आत्महत्या करेन; युवतीची धमकी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील युवतीने युवकाच्या थेट घरी जाऊन नातेवाईकांसमवेत वाद घातला आहे. वादाचे कारण असे की… “तुमच्या मुलाशी लग्न लावून द्या, नाहीतर तुमच्या घरासमोरच आत्महत्या करेन”. अशी धमकी दिल्याने या युवतीविराेधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील एका युवतीचे युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू असून प्रियकरासोबतच लग्न करून द्यावे, असा हट्ट करत या युवतीने सिनेस्टाइल थेट प्रियकराच्या घरी जात लग्नाची मागणी घातली. तसेच विवाह करुन दिला नाही तर घरासमोरच आत्मदहनाचा इशारा युवतीने दिला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात युवतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भडगाव पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button