Nashik Diwali : त्र्यंबकराजाच्या पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पूजा | पुढारी

Nashik Diwali : त्र्यंबकराजाच्या पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पूजा

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
कार्तिक अमावास्या अर्थात लक्ष्मीपूजनानिमित्त भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पेशवेकाळातील परंपरा आजही जोपासली जात आहे. लक्ष्मीपूजनास त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा चौरंगावर ठेवून त्यावर प्राचीन रत्नजडित मुकुट ठेवला जातो. संस्थानच्या या मुकुटाची पूजा केली जाते.

सोमवारी सायंकाळी मंदिराच्या विश्वस्त तृप्ती धारणे आणि त्यांचे पती पंकज धारणे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन झाले. यावेळेस ट्रस्टचे कर्मचारी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर : लक्ष्मीपूजनानिमित्त त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा आणि प्राचीन रत्नजडित मुकुटाची पूजा करताना मंदिराच्या विश्वस्त तृप्ती धारणे आणि पती पंकज धारणे.

Back to top button