पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना | पुढारी

पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा अशी मागणी युवासेनेच्या विस्तारक प्रियंका जोशी यांनी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली दिले.

साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती खरेदी- विक्रीसाठी व यासारख्या अनेक कामांसाठी लाभदायक क्षेत्राच्या दाखल्याची गरज भासते. परंतु, लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळ्यातील सिंचन भवन येथे खेट्या मारव्या लागतात. त्यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी लोटतो. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मात्र शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला हा तालुकास्तरावरच उपलब्ध होतो. त्याच धर्तीवर साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांनाही लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावर पाटबंधारे विभागामार्फत मिळावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button