चार हजार शाळांच्या अनुदानाची घोषणा 15 नोव्हेंबरपर्यंत : केसरकर | पुढारी

चार हजार शाळांच्या अनुदानाची घोषणा 15 नोव्हेंबरपर्यंत : केसरकर

येवला; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत शिक्षकांच्या प्रश्नांवर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या आंदोलनाची दखल घेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील तीन हजार 961 शाळांसाठी येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत अनुदानाची घोषणा करण्याचे आश्वासन दिले. प्रचलित अनुदान, सेवा संरक्षण, जुनी पेन्शन या विषयांवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासनही केसरकर यांनी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांना दिले.

शिक्षकांच्या अनुदानासह अनेक प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुंबईत विधान भवनाबाहेर नाशिकचे शिक्षक आमदार किशोर दराडे व पदवीधर आमदार सुधीर तांबेंसह शिक्षक आमदार बाळाराम पाटील, विक्रम काळे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, राजेश राठोड, अ‍ॅड. किरण सरनाईक, जयंत आसगावकर आदींनी ठिय्या आंदोलन केले. 2012 व 2013 च्या सर्व वर्ग व तुकड्यांना 100 टक्के अनुदान लागू करावे, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निधीसह घोषित करणे, अंशत: अनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान लागू करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Back to top button