

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आडगाव येथील होळी चौकात पाच ते सहा चोरट्यांनी घरफोडी करून १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बाळू उत्तम माळोदे (५४, रा. आडगाव) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने १५ ऑक्टोबरला रात्री घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पाेलिस अधिक तपास करीत आहेत.