धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्थ | पुढारी

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्थ

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी पवार आणि उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन मतदारांनी महाविकास आघाडीला मदत न करता तटस्य राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तटस्य राहणाऱ्या सदस्या शालिनी भदाणे यांच्या गाडीवर शाई फेक करून घोषणाबाजी केली.

धुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे निर्विवाद बहुमत असल्याने अध्यक्षपदावर भाजपाचेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड होणार हे स्पष्ट होते. अध्यक्षपदासाठी फागणे गटाच्या अश्विनी पवार तर उपाध्यक्ष पदासाठी शिरपूर तालुक्यातील शिंगावे गटातील देवेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर झालेल्या विशेष सभेत भाजपच्या दोन्ही उमेदवारांना त्यांचे ३६ मतासह दोन अपक्षांनी मतदान केले .या निवडणूक प्रक्रियेत शिवसेनेच्या शालिनी बाळासाहेब भदाणे आणि अनिता प्रभाकर पाटील हे दोघेही तटस्य राहिले. तर उर्वरित १६ सदस्यांनी महाविकास आघाडीच्या सुनिता सोनवणे आणि मोतनबाई पाटील यांना मतदान केले.

या निवडणुकीत भाजपाच्या दोनही सदस्यांना ३८ मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. या घटनेनंतर सदस्य शालिनी भदाणे या गाडीतून घरी जात असताना त्यांना शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी अडवून घोषणाबाजी करीत त्यांच्या गाडीवर शाही फेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणामुळे संबंधित सदस्य भदाणे यांचे पती सरपंच बाळासाहेब भदाने हे संतप्त झाले असून त्यांनी देखील आंदोलक शिवसैनिकांवर टीकेची तोफ डागली आहे.

सुपारी बहाद्दरांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये : बाळासाहेब भदाणे यांची टीका

प्रत्येक निवडणुकीत स्वत:ची बोली लावणार्‍या सुपारी बहाद्दरांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांवर भ्याड हल्ला करण्यात कसली आली मर्दानगी, असा सवाल बोरकुंडचे प्रथम लोकनियूक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसताना केवळ विरोधासाठी विरोध म्हणुन उमेदवार देऊ नये, व विकासाला खिळ घालू नये अशी आमची या निवडणुकीत भुमिका होती. पण तरीही केवळ राजकीय आडमुठेपणाच्या भूमिकेतून काही लोकप्रतिनिधींनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार दिले,असे भदाणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button