नाशिक : अबब..! लिलावात कोथिंबिरीला मिळाला १९,१०० रूपयांचा भाव | पुढारी

नाशिक : अबब..! लिलावात कोथिंबिरीला मिळाला १९,१०० रूपयांचा भाव

पंचवटी, पुढारी वृत्तसेवा : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोड वरील मुख्य बाजार आवारात शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला तब्बल एकोणीस हजार शंभर रुपये इतका भाव मिळाला.

कृषी उपन्न बाजार समितीत नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दूगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर येथून या ठिकाणी पालेभाज्यांची आवक होत असते. शुक्रवारी (ता.२३) रोजी सायंकाळी पालेभाज्याचे लिलाव झाला.

दिंडोरी तालुक्यातील नवळपाडा गावातील शेतकरी युवराज गावित हे कोथिंबीर घेऊन आले होते. या कोथिंबीरीस साईधन कंपनीने तब्बल १९,१०० रू इतका भाव केला. ही कोथिंबीर मनोज परदेशी या व्यापाऱ्याने घेतली असून गुजरात सुरत येथील मार्केटला पाठविणार आहेत.

Back to top button