नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका | पुढारी

नाशिक : रात्रभर पूराच्या पाण्यात अडकले निवडणूक पथक, अशी झाली सुटका

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा 

दिंडोरी तालुक्यात काल मोठ्या ग्रामपंचायतींसह लहान ग्रामपंचायतींमध्येसुद्धा अतिशय चुरशीने मतदान झाले. दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी तारांबळ उडाली.

दिंडोरी तालुक्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी काल देहरे येथे गेलेले पथक नदीला पाणी आल्यामुळे रात्रभर पूराच्या पाण्यातच अडकून पडले होते. आज सकाळी पाणी ओसरल्यावर मतमोजणीच्या ठिकाणी हे पथक हजर झाले.

दिंडोरी चे तहसीलदार पंकज पवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. बिकट परिस्थितीत देखील आपले कर्तव्य चोख बजावत कार्य पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Back to top button