नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा | पुढारी

नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने म्हाडा कॉलनीतील रस्त्यातील खड्ड्यांना चक्क गुलाल, नारळ वाहून ढोल-ताशांचा गजर केला. या अनोख्या आंदोलनाची सिडकोत चर्चा रंगली.

म्हाडा कॉलनी भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. मनपाकडे तक्रार करूनही रस्ते दुरुस्ती न झाल्याने मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने खड्डयांवर गुलाल व नारळ वाहून खड्ड्यांचे पूजन केले. आंदोलनस्थळी ढोल-ताशा वाजवून मनपा प्रशासन व इंजिनिअर, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनात ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे, विजू अहिरे, अर्जुन वेताळ, कैलास मोरे, विशाल भावले, अतुल पाटील, देवचंद केदारे, रितिक यशवंते, सागर माळी, गोपाल महाजन, धम्मदीप कांबळे, क्षितिज पगारे, विनायक रोकडे आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button