Nashik Crime : घरफोडीत सोन्याचा राणीहार लंपास | पुढारी

Nashik Crime : घरफोडीत सोन्याचा राणीहार लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चावीने दरवाजा उघडून चोरट्याने घरातील सोफ्याखाली असलेला सोन्याचा राणीहार लंपास केला. द्वारका येथील अनुसयानगर परिसरात 17 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान ही घरफोडी झाली.

मीना रमेश बधान यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने चावीने घराचा दरवाजा उघडून सोफ्याखाली असलेला 70 हजार रुपयांचा साडेतीन तोळे वजनाचा राणीहार लंपास केला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button