

नाशिक (पंचवटी) : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना दिंडोरी रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश दिनेश झोंबाड (40, रा. आंबेडकरनगर, म्हसरूळ) याचे पत्नी शैला अंकुश झोंबाड यांच्यासोबत कौटुंबिक वाद होते. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीच्या रागातून पती अंकुश याने पत्नी शैला हिच्या गळ्यावर धारदार वस्तूने वार केले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.