नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक | पुढारी

नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रविवार कारंजा परिसरातील देवधर लेनपासून काढण्यात आलेल्या या मिवरणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाचे संकट बर्‍यापैकी शिथिल झाल्याने वाजत-गाजत भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक काढण्यात आली.

काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने नाशिककरांना गणरायाच्या आगमनाची ओढ लागली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी भद्रकालीच्या श्रीमंत राजाचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाल्याने, परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी नाशिककरांनी मिरवणुकीचा मनसोक्त आनंद लुटला. रविवार कारंजा परिसरातील देवधर लेनपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी विराजमान असलेल्या चांदीच्या गणपतीजवळ बाप्पाचे पूजन करण्यात आले. गणरायाची 11 फूट भव्य दिव्य मूर्ती आणि त्यावर केलेली आकर्षक रोषणाई यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ढोल पथकांनी यावेळी केलेल्या ढोल वादनाने परिसर दुमदुमला होता. तसेच यावेळी वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले होते. कारंजा मेन रोडपासून पुढे भद्रकालीकडे मिरवणूक मार्गस्थ झाली.

हेही वाचा :

Back to top button