Nashik : लासलगाव-कोटमगाव मार्गावर चालकांची कसरत | पुढारी

Nashik : लासलगाव-कोटमगाव मार्गावर चालकांची कसरत

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येथील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर साइडपट्ट्या न भरल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागतो. या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यातच रस्त्यावर साइडपट्ट्या नसल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटण्याचा धोका आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्यावी मागणी नागरिकांनी केली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल घेऊन येतात. परिसरातील अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात ये-जा करीत असतात. मात्र, खराब रस्ते आणि साइडपट्ट्या नसल्याने येथे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. यातूनच येथे वाहतूक कोंडी होऊन विद्यार्थी, शेतकर्‍यांचा खोळंबा होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन साइडपट्ट्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विकास रायते यांनी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे कित्येक वर्षांपासून साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यात कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. सा. बां. विभागाने तत्काळ काम सुरू न केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन केले जाणार आहे.
-विकास रायते,
खडक माळेगाव

हेही वाचा :

Back to top button