प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, येवल्याहून विंचूरकडे कांदे घेऊन जाणारी मालवाहू रिक्षा क्रमांक एम. एच. 15 सीके 8920 आणि विंचूरच्या दिशेने येवल्याच्या दिशेकडे येत असलेली स्कूल बस एम. एच. 15 एके 902 यांच्यात भीषण अपघात होऊन मालवाहू रिक्षा मधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने लासलगाव पोलिसांनी जखमींना उपचारासाठी पुढे पाठविले.