नाशिक : पन्नास हजार मतदारांचे ‘आधार’ला मतदार कार्ड लिंक

नाशिक : पन्नास हजार मतदारांचे ‘आधार’ला मतदार कार्ड लिंक

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मतदार कार्ड आधारला लिंकिंग करायच्या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात ५० हजार ७९२ मतदारांनी त्यांचे मतदान कार्ड आधारशी संलग्न केले. यामध्ये येवला मतदारसंघ आघाडीवर आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक निर्धोक करण्यासाठी आधारला मतदार कार्ड लिंक करायचा उपक्रम हाती घेतला आहे. दि. १ ऑगस्टपासून सुरू झालेला हा उपक्रम ऐच्छिक असला, तरी त्याला जिल्ह्यातील मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४६ लाख ११ हजार मतदार आहेत. त्यापैकी ५० हजार ७९२ मतदारांनी निवडणूक शाखेकडे आधार लिंकिंगसाठी अर्ज केले आहेत. दाखल अर्जांची आकडेवारी बघता, शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांचा लिंकिंगकडे ओेढा अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. येवला मतदारसंघातून सर्वाधिक १२ हजार ६१ मतदारांनी आधार लिंकिंगसाठी निवडणूक शाखेकडे अर्ज केले आहेत. त्याखालोखाल दिंडोरी तसेच चांदवड मतदारसंघातील अनूक्रमे ८१४७ व ६३७७ मतदारांचा समावेश आहे. नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघांपैकी पश्चिम मतदारसंघामधून सर्वात कमी ९१७ मतदारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आयोगाच्या आदेशानूसार आधार लिंकींगचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी या उपक्रमात सहभागी होत आधार लिंकिंगचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी केले आहे.

आधार लिंकसाठी मतदार संघाप्रमाणे प्राप्त अर्ज असे…

नांदगाव १५९७, मालेगाव मध्य  २०५४, मालेगाव बाह्य ९८२, बागलाण १,४१४, कळवण ४,८४१, चांदवड ६,३७७, येवला १२,०६१, सिन्नर ३,९६५, निफाड १,१३४, दिंडोरी ८,१४७, नाशिक पूर्व १,२४४, नाशिक मध्य  १,५८५, नाशिक पश्चिम ९१७, देवळाली १,७७७, इगतपुरी २,६९७ तर एकूण ५०,७९२ अर्ज आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news