नाशिक : रुबाब कापड दुकानावर चोरट्यांचा डल्ला | पुढारी

नाशिक : रुबाब कापड दुकानावर चोरट्यांचा डल्ला

 नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहरातील सरदवाडी रस्त्यावर असलेल्या पांडवनगरी या उपनगरात चोरट्यांनी रुबाब या कापड दुकानाच्या मागील पत्रा कापून दुकानात प्रवेश करीत सुमारे 34 हजार रुपये किंमतीचे कपडे चोरून नेल्याची घटना घडली आहे.
पांडवनगरी भागात शुभम गोरक्षनाथ आव्हाड यांचे रुबाब कलेक्शन नावाने कापड दुकान आहे. या दुकानात चोरट्यांनी शनिवारी, दि.13 रात्रीच्या वेळी दुकानाच्या मागील भागाचा पत्रा कटरच्या साह्याने कापून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातून 14 हजार रुपये किंमतीचे पुरुषाचे हाफ फुल बाहीचे शर्ट, दहा हजार पाचशे रुपयांचे पुरुषांच्या फॉर्मल पॅन्ट, साडेचार हजार रुपयांच्या जीन्स पॅन्ट तसेच 3 हजार 200 च्या नाईट पॅन्ट व 800 रुपये किंमतीच्या चप्पलांच्या जोड असा दुकानातील एकूण 34 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. आव्हाड यांनी याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. हवालदार नवनाथ पवार अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा:

Back to top button