नाशिक : बाप्पाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांचे गणेशमूर्तीचे धडे | पुढारी

नाशिक : बाप्पाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांचे गणेशमूर्तीचे धडे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शहरी व ग्रामीण अशा 38 शाळांमध्ये बुधवारी (दि.10) शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेत शहरी व ग्रामीण अशा 38 शाळांमधील 12 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी दिली.

कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल व सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून गणेशमूर्ती घडविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नुकतीच कलाशिक्षकाची बैठक घेण्यात आली. संस्थेच्या 38 शाळांतील कलाशिक्षक बुधवारी शाळेत शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा घेणार आहेत. यात 38 शाळांतील 12 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यात विद्यार्थ्यांकडून आकर्षक मूर्ती व रंगकाम करवून घेतले जाणार आहे. तीच मूर्ती ते शाळेत व स्वतःच्या घरी स्थापन करणार आहेत. मूर्तीचे विसर्जनही घरीच करणार आहेत. पालकांनी कार्यशाळेला भेट द्यावी, असे आवाहन सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी केले आहे.

हेही वाचा:

Back to top button