नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद | पुढारी

नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवेला प्रतिसाद

नाशिक :पुढारी वृत्तसेवा

बहुप्रतीक्षित नाशिक-दिल्ली विमानसेवेला गुरुवारी सकाळपासून प्रारंभ झाला असून, स्पाइस जेटच्या या सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी एकूण 163 प्रवाशांची ने-आण करण्यात आली आहे.

22 जुलैपासून सुरू झालेल्या नाशिक-हैदराबाद सेवेनंतर गुरुवारपासून दिल्ली विमानसेवेला प्रारंभ झाला. दिल्ली येथून सकाळी 7.55 वाजता विमानाने भरारी घेतली. ते नाशिकला 9.45 वाजता पोहोचले. या विमानात 91 प्रवासी होते. तर नाशिकहून सकाळी 10.15 वाजता परतीच्या प्रवासाला निघालेले विमान दुपारी 12.15 वाजता दिल्लीला पोहोचले. त्यातून 72 जणांनी प्रवास केला. या विमानाची आसनक्षमता 180 इतकी आहे. दिल्ली विमानसेवेचे हे वेळापत्रक 9 ऑगस्टपर्यंत असून, 10 ऑगस्टपासून या वेळांत बदल होणार आहे. त्यानुसार दिल्ली येथून सकाळी 6.35 वाजता विमान उड्डाण करणार असून, ते 8.30 वाजता नाशिकला पोहोचणार आहे. तर नाशिकहून ते सकाळी 9 वाजता भरारी घेणार असून, 10.45 वाजता दिल्लीला पोहोचणार आहे. ही सेवा दररोज उपलब्ध असणार आहे. याशिवाय नाशिक येथून अलायन्स एअर व स्टार एअरचीही विमानसेवा सुरू असून, त्याद्वारे नाशिककरांना नवी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव या शहरांसाठी सेवा मिळत आहे.

हेही वाचा:

Back to top button